प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोनाचे संकट संपलेले नसतानाच महाड पोलादपूर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून प्रामुख्याने ग्रामीण लेप्टोस्पायरोसीस सदृश्य आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत. या आजाराचे निदान करणारी प्रयोगशाळा महाड पोलादपूरमध्ये नसल्याने या आजारावर तातडीने उपचार करण्याकामी डॉक्टरांना अडचणी निर्माण होत आहेत. या आजारामुळे आतापर्यंत आठ ते दहा जणांचा मृत्यु झाला आहे.

महाड (Mahad).  कोरोनाचे संकट संपलेले नसतानाच महाड पोलादपूर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून प्रामुख्याने ग्रामीण लेप्टोस्पायरोसीस सदृश्य आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत. या आजाराचे निदान करणारी प्रयोगशाळा महाड पोलादपूरमध्ये नसल्याने या आजारावर तातडीने उपचार करण्याकामी डॉक्टरांना अडचणी निर्माण होत आहेत. या आजारामुळे आतापर्यंत आठ ते दहा जणांचा मृत्यु झाला आहे.

या संदर्भात महाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता लॅप्टोची साथ ही विशेष करून उंदीर अथवा जनावरांचे मूत्र पाण्यात मिसळून त्या पाण्याचा संपर्क मानवाच्या शरीरावर झालेल्या जखमांशी आला तर त्यातून ही लागण होत असते अशी माहिती त्यांनी दिली. या आजारामध्ये शरीरातील प्लेटलेट कमी होणे, ताप येणे, उलट्या होणे अशी लक्षणे आढळून येतात लॅप्टो डेंगू मलेरीया न्युमोनिया अशा प्रकारच्या साथीची लागण होऊ नये यासाठी जखम असणाऱ्या लोकांना शेतातील पाण्यात अथवा ज्या ठिकाणी जनावरांचा वावर असतो अशा पाण्यात जाणे टाळावे रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा आपल्या घराचे आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा ताप आल्यास अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार सुरु करावेत असे आवाहन डॉ. बिराजदार यांनी केले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रासह महाड शहरात खाजगी डॉक्टरांकडे देखील अशा आजाराचे मोठे रुग्ण येत आहेत. कोरोना महामारी संदर्भात शासनाने ज्या पद्धतीने युद्ध पातळीवर प्रत्येक जिल्हास्थळी विशेष प्रयोगशाळेची निर्मिती केली त्याचप्रमाणे आता प्रत्येक तालुका ठिकाणी बदलत्या साथी व आजारांवर नियंत्रण ठेवण्याकरिता अशा प्रयोगशाळा निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.