crocodile caught in net

मासे पकडण्याच्या जाळ्यात एक मगर अचानक अडकली.(Crocodile caught in fishing net) शहरातील ग्रीन पार्क इमारतीमधील तरुण आणि सिस्केपच्या सदस्यांनी मगरीची सुटका करून वन विभागाच्या मदतीने तिला सुरक्षित ठिकाणी सोडले.

    महाड: मासे पकडण्याच्या जाळ्यात एक मगर अचानक अडकली.(Crocodile caught in fishing net) शहरातील ग्रीन पार्क इमारतीमधील तरुण आणि सिस्केपच्या सदस्यांनी मगरीची सुटका करून वन विभागाच्या मदतीने तिला सुरक्षित ठिकाणी सोडले.

    ग्रीन पार्क इमारतीजवळ नदी पात्रात मासेमारी करणाऱ्या एका इसमाने मासे मारण्याच्या जाळ्यात एक मगर अडकून पडल्याची माहिती या सोसायटीमधील बाबू कदम, राजुदास पवार, सतिश पवार, विजय पवार, बजरंग दाभेकर आणि रोशन माने यांना दिली. या सर्वांनी नदी पात्राजवळ जात या मगरीला बाहेर काढले. सिस्केप संस्थेला याची माहिती दिली. त्यानंतर सिस्केपचा सदस्य ओंकार माने याने वन विभागाला कळविले.

    वन विभागाचे अधिकारी प्रशांत शिंदे, वनपान विजयकांत पवार, वनरक्षक पी .डी. जाधव, प्रकाश पवार यांच्यासह संस्थेचे सदस्य ओमकार माने, अक्षय भवरे,परेश खाडे,श्रद्धा जोशी,चिंतन वैष्णव,मित डाखवे,प्रणव कुलकर्णी,योगेश गुरव यांनी जाळ्यातून सुखरूप बाहेर काढून या मगरीची पाहणी केली गेली.

    पाहणी अंती असे लक्षात आले की ही मगर एप्रिल महिन्यामध्ये वडवली गावात पकडली होती.वन विभाग, महाड व सिस्केप संस्थेच्या मदतीने मगरीला जाळ्यातून सोडवून पुन्हा तिच्या मूळ अधिवासात सोडण्यात आले.