पोलादपूरात चक्रीवादळाचा फटका, २२ तासानंतर देखील बत्ती गुल

पोलादपूर : काल झालेल्या चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्यासह पोलादपूर तालुक्याला मोठ्या प्रमाणावर बसला असून तालुक्यात प्रचंड नुकसान झाले असून २२ तासानंतर देखील पोलादपूरात बत्ती गुल झालेली आहे. काल

पोलादपूर : काल झालेल्या चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्यासह पोलादपूर तालुक्याला मोठ्या प्रमाणावर बसला असून तालुक्यात प्रचंड नुकसान झाले असून २२ तासानंतर देखील पोलादपूरात बत्ती गुल झालेली आहे. काल सकाळीच पोलादपूरात वादळी पावसाने सुरवात केल्यानंतर पोलादपूरात लाईट बंद करण्यात आली व दुपारच्या वेळेत वादळाने जोर घेत अनेकांचे नुकसान केले असून तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठा करणारे पोल कोसळल्याने काल सकाळपासून आज सकाळपर्यंत २२ तास होऊन देखील पोलादपूरात बत्ती गुल झालेली आहे.

याबाबत महावितरणचे सुनील सूड यांच्याशी विचारणा केली असता काल झालेल्या वादळी पावसात अनेक पोळ कोसळले असल्याने दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी आज सायंकाळी पर्यंत वेळ लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.