रायगडला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा, समुद्र किनाऱ्यावर ३ दिवसांत सापडले ८ मृतदेह

अलिबाग तालुक्यात शनिवारी सात, मुरूड येथे शुक्रवारी रात्री एक असे पुरुष जातीचे आठ मृतदेह सापडले आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे खोल समुद्रात बुडालेल्या पी ३०५ बार्जवरील मृतदेह असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाने ओएनजीसी आणि मुंबई पोलिसांनी माहिती कळवली आहे.

    रायगड: तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae)  रायगड (Raigad) समुद्र किनाऱ्यावर तीन दिवसांत आठ मृतदेह (Dead body) सापडले आहेत. हे मृतदेह पी ३०५ बार्जवरील कर्मचाऱ्यांचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    अलिबाग तालुक्यात शनिवारी सात, मुरूड येथे शुक्रवारी रात्री एक असे पुरुष जातीचे आठ मृतदेह सापडले आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे खोल समुद्रात बुडालेल्या पी ३०५ बार्जवरील मृतदेह असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाने ओएनजीसी आणि मुंबई पोलिसांनी माहिती कळवली आहे.

    सध्या हे आठही मृतदेह अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. ओएनजीसी पथक नातेवाईकांना घेऊन रायगडात येणार असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. तालुक्यातील नवगाव दोन, सासावणे दिघोडी एक, आवास एक तर किहीम समुद्रकिनारी तीन तर मुरुड समुद्रकिनारी एक असे आठ मृतदेह वाहून समुद्र किनारी आले आहेत. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नसून पोलीस याबाबत तपास करीत आहेत.