चक्रीवादळामुळे पाथरशेत येथील घरांचे नुकसान

सुतारवाडी: काल सायंकाळी अचानकपणे पावसाने काळोख केले. यावेळी पावसाचा थेंबही पडला नाही. मात्र अचानकपणे चक्रीवादळाला सुरुवात होऊन ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले. पाथरशेत येथील रमेश

सुतारवाडी: काल सायंकाळी अचानकपणे पावसाने काळोख केले. यावेळी पावसाचा थेंबही पडला नाही. मात्र अचानकपणे चक्रीवादळाला सुरुवात होऊन ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले. पाथरशेत येथील रमेश बेंडू सालदूर  यांच्या घराच्या पुढच्या व मागच्या बाजूचे पत्रे उडून अक्षरश: तुटलेल्या पत्रांचा ढीग जमा झाला. त्यांच्या घरावर दहा फुटी सिमेंटचे ३० पत्रे चक्रीवादळामुळे उडून चक्काचूर झाले. या चक्रीवादळात रमेश सालदूर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून याबाबत त्यांनी रोहा तहसिलदार कविता जाधव तसेच तलाठी यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे पंचनामे करून झालेले आर्थिक नुकसान मिळण्याविषयी नम्र विनंती केली आहे. घरावरील सर्व सिमेंट पत्रे उडल्यामुळे ते आता राहणार कुठे, पावसाळा जवळ आला असून निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी शासनाने लवकरात लवकर आर्थिक सहाय्य करावे असे प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या पत्रकात रमेश सालदूर यांनी म्हटले आहे. या चक्रीवादळाचा तडाखा पाथरशेत येथील बौद्धवाडी तसेच आठलेवाडी गावालाही बसला आहे. तेथेही पत्रे उडून आर्थिक नुकसान झाले आहे.