शासन नवीन निकष ठरवून देणार नुकसान भरपाई – कृषीमंत्र्यांनी रायगड दौऱ्यामध्ये दिली माहिती

अलिबाग: कोकणात झालेल्या नुकसानाचा अंदाज अंतिम करताना आतापर्यंत नुकसान निश्चित करण्याच्या पद्धतीला फाटा देत महाराष्ट्र शासन नवीन निकष ठरविणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाई समाधानकारकपणे होणार आहे, असे

अलिबाग: कोकणात झालेल्या नुकसानाचा अंदाज अंतिम करताना आतापर्यंत नुकसान निश्चित करण्याच्या पद्धतीला फाटा देत महाराष्ट्र शासन नवीन निकष ठरविणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाई समाधानकारकपणे होणार आहे, असे कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी आज अलिबाग येथे सांगितले. भरपाईचे कोकणासाठीचे नवे निकष मुख्यमंत्री येत्या दोन दिवसातच जाहीर करतील, असेही ते म्हणाले.

कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी आज रायगड जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी जिते. वराठी, केळघर, रेवदंडा, आक्षी आदी गावांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. आज सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत शासन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर करीत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. कोकणाचे प्रचंड नुकसान झाले असून झाडांची प्रचंड हानी झाली आहे. नारळ-सुपारीच्या बागा, आंब्याची उत्पन्न देणारी झाडे जमिनदोस्त झाली. काही फळझाडे मधूनच तुटली असली तरी कृषी विद्यापीठांच्या मदतीने त्यांना कलम पद्धतीचा वापर करून उभी करता येतील. त्यासाठी कोकणात तज्ज्ञांचे पथक पाठविण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत ते ठिकठिकाणी पोहोचतील, अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली.
केवळ बागांचेच नाही तर मसाल्याच्या रोपांचेही नुकसान झाले. ही आंतरपिके म्हणून कोकणातली शेतकरी घेत होता.रोजगार हमी योजनेतून पडलेली झाडे तोडण्याचा प्रयोग केला जाणार आहे. याला कारण म्हणजे असंख्य झाडे भुईसपाट झाली आहेत. त्यांना हटवून बागायती जमीन लागवड योग्य करायची तर हे काम युद्धस्तरावर हाती घेतले पाहिजे, असे भूसे म्हणाले.
कृषीविषयक पंचनामे अत्यंत काळजीपूर्वक करावे लागतील. चक्रीवादळात आता झाडे वाचल्यासारखी दिसतात पण त्यांची मुळे सैल झालेली आहेत. त्यांना आगामी पावसात धोका आहे. थोडासा वादळी वारा सुटला तरी झाडे पडतील, अशी भीती आहे, असे कृषीमंत्री म्हणाले. जुनी झाडे चरितार्थाचा आधार होती. त्यांच्या जागी नवी झाडे लावणे व उत्पन्न काढणे खूप कालावधी घेणारा उपाय आहे. रायगड जिल्ह्यात २२ हजार हेक्टर बागायती क्षेत्रातील पिक व झाडांची हानी झाली आहे. कृषी विभाग आपल्या विविध योजना येथील शेतकऱ्यांपर्यंत नेईल. योजनांचे कार्यान्वयन करताना सहृदय दृष्टीकोन राहील, असे मंत्री म्हणाले. आता कृषी क्षेत्राला लाभ देताना वाढीव १० हजार हेक्टर क्षेत्र डोळ्यासमोर ठेवले आहे, असे भूसे म्हणाले.चक्रीवादळ दोन टप्प्यात आले. वादळ थांबले वाटत असतानाच अचानक वादळाने जोर धरला. त्यामुळे पूर्वनियोजन असतानाही थोडी गडबड उडाली, असे भूसे म्हणाले.