लॉकडाऊनमध्ये मद्य विक्री करणाऱ्या पनवेलच्या दत्ता इन हॉटेलवर पोलिसांचा छापा

पनवेल : लॉकडाऊनमध्ये अवैधरीत्या मद्य विक्री करणाऱ्या पनवेल एस.टी. स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या ‘हॉटेल दत्ता इन’ या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे

 पनवेल : लॉकडाऊनमध्ये अवैधरीत्या मद्य विक्री करणाऱ्या पनवेल एस.टी. स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या ‘हॉटेल दत्ता इन’ या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या वतीने टाकण्यात आलेल्या छाप्यात अंदाजे ५३ हजार १५ रुपये किमतीचा मुद्देमाल आणि ह्युन्दाईची १० लाख रुपये किमतीची क्रेटा कार असा एकूण १० लाख ५३ हजार १५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. सर्व  प्रकारच्या मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अवैध मार्गाने विक्री करणाऱ्या पनवेलमधील दत्ता इन हॉटेलवर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल तारमळे, पोलीस हवालदार राऊत, आयरे, थोरात, पोलीस नाईक अमोल वाघमारे, मोरे, पोलीस शिपाई गर्दनमारे, यादवराव घुले यांनी कारवाई केली. यावेळी बिअरचे  टिन व काचेच्या बाटल्या मिळून एकूण १८७, ब्रीझर ५७, वाईन २३ तसेच सिग्नेचर व्हिस्की एकूण ८ बाटल्या (१८०मिली) असा  अंदाजे ५३ हजार १५ रुपये किमतीचा मुद्देमाल आणि  १० लाखांची क्रेटा कार असा एकूण १० लाख ५३ हजार १५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्यात हॉटेल दत्ता ईनचा मालक प्रमोद विठ्ठल शेट्टी  याच्यासह गिऱ्हाईक रमण बोहरा आणि जगदीश गायकर अशा तिघांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.