पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा दिव्यांगांसाठी मोठा निर्णय – अनुदान थेट खात्यात जमा होणार

पनवेल :पनवेल महापालिकेच आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज दिव्यांगासाठी मोठा निर्णय घेऊन थेट त्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफरद्वारे रूपये ४१,६१,६९६ /- जमा करण्यात आल्याची माहिती

पनवेल :पनवेल महापालिकेच आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज दिव्यांगासाठी मोठा निर्णय घेऊन थेट त्यांच्या  खात्यात डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफरद्वारे रूपये ४१,६१,६९६ /- जमा करण्यात आल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांगांना महापालिका  लवकरच निर्वाह भत्ता सुरू करणार असल्याचे आणि सिडको कडून हस्तांतरित होणार्‍या बाजाराच्या जागेत पाच टक्के राखीव जागा ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांगाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या  बैठकीत तत्कालीन आयुक्तांनी दिली होती. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महापालिकेचा कार्यभार स्वीकारल्यावर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश दिले होते. 

 सहायक आयुक्त तेजस्विनी गलांडे यांनी कल्याण विभागातून उपलब्ध ५% निधीतून १०० % निधी दिव्यांगासाठी खर्च केला आहे. लॉकडाऊनच्या काळात दिव्यांगासाठी या अनुदानातून मदतच होणार आहे अपंगत्वाचे प्रमाण ४०-६० % असलेल्या ५७६ लाभार्थीना १५,०३,९३६/-  ६१-८०% अपंगत्व असलेल्या २९२ लाभार्थीना १२,८८,०१२ आणि ८१-१००% अपंग गटामधील २६८ लाभार्थीना १३,६९,७४८ असे एकूण ४१,६१,६९६ रुपयांचे अनुदान बँकेत वर्ग करण्यात आले आहे.आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने दिव्यांग कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त तेजस्विनी गलांडे यांनी अनुदान थेट खात्यात जमा करण्याची कार्यवाही गुरुवारी पूर्ण केली.