कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे धाटाव बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

सुतारवाडी - वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे व्यापारी वर्गाने धाटाव बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. रोह्यासह कोलाड परिसरातील वाढत्या कोरोना संसर्गजन्य महामारी आजाराचा धाटाव

 सुतारवाडी – वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे व्यापारी वर्गाने धाटाव बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. रोह्यासह कोलाड परिसरातील वाढत्या कोरोना संसर्गजन्य महामारी आजाराचा धाटाव ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांना धोका होऊ नये. म्हणून धाटाव येथील व्यापारीवर्गांनी धाटाव छोटेखानी बाजारपेठ शनिवार दि. २७ ते सोमवार दि.२९ जून असे तीन दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. यामधे डॉक्टर्स व मेडिकल्स मात्र सुरु राहणार आहेत. असे येथील व्यापारीवर्गांनी  सांगितले आहे. या संदर्भात सर्व व्यापा-यांनी एकत्रीत चर्चा मसलत करुन येथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतलेला आहे. असे सांगण्यात आले आहे. यावेळी सर्व व्यापारीवर्ग तसेच यशवंत ग्रामपंचायत धाटावचे माजी सरपंच विनोद पाशिलकर, ग्राम पंचायत आजी माजी सदस्य आदी यावेळी  उपस्थित होते. कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आकडे मोठ्या प्रमाणात  रोहा शहरासह कोलाड परिसरात दिसून येत आहेत.

रोजच्या रोज कोरोना पॉझिटीव्ह आकडे वाढतच आहेत. त्यामुळे रोहा शहर आणि कोलाड परिसरात गेली चार दिवसांपासून संपूर्ण मार्केट बंद पाळला जात आहे. मात्र  अशा परिस्थितीत रोहा शहरातील तसेच कोलाड परिसरातील नागरिक भाजी, मच्छी, मटण, चिकन, वाईन व किराणा खरेदीसाठी धाटाव छोटेखानी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी करतांना दिसत आहेत. त्यामुळे धाटाव परिसरातील ग्रामस्थांना कोरोनाचा मोठा धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त होत असल्याने येथील व्यापारीवर्गांनी पुढाकार घेत येथील मार्केट तीन दिवस कडकडीत बंद ठेवणार आहेत. असा निर्णय घेतलेला आहे.

त्यामुळे येथील व्यापारीवर्गांचे शासनाकडून कौतुक करण्यात येत आहे. या बंदमध्ये डॉक्टर्स व मडिकल्स वगळता किराणा, भाजीची दुकाने, हॉटेल्स, कपडे, पाणपट्टी, चिकन, मटन, मच्छी मार्केट, वाईन व इतर दुकाने आदी सर्वच बंद राहणार आहेत. यामधे शासनमान्य शिव भोजन थाळीसुद्धा बंद राहणार असल्याचे धर्मराज माने यांनी सांगितले आहे.