अदिती तटकरे यांच्या हस्ते कर्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण, श्रीवर्धन वासीयांमध्ये समाधान

श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सेवा प्राप्त करुन दिल्याने श्रीवर्धन तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वतःच्या घरी गणरायाचे आगमन झाले असुन देखील जनतेच्या सेवेला प्राधान्य देत, आज आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाला सुसज्ज रुग्णवाहिका दिल्याबद्दल श्रीवर्धनच्या नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात अत्यवस्थ रुग्णांना मुंबई, पुणे येथे नेण्यासाठी गेले कित्येक वर्ष सुसज्ज व सर्व सोयी सुविधा असलेली रुग्णवाहिका नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले होते. १०८ रुग्णवाहिका देखील या आधी श्रीवर्धन रुग्णालयात नव्हती. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या स्थानिक आमदार फंडातून सुसज्ज व सर्व सोयीयुक्त कर्डियाक रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालयाला दिली.

रुग्णवाहिकेचे लोकार्पण त्यांच्याच हस्ते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ मधुकर ढवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र भरणे, नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. महिना अगोदर रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धनला १०८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अदिती तटकरे यांनी रुग्णालयाला डिजिटल एक्स्- रे मशीन देवुन सेवा तत्काळ सुरु केली होती. आज गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर कर्डियाक रुग्णवाहिकेचे लोकर्पण केले.