letter to chatrapati sambhaji raje

महाड: महाड मढेघाट मार्गे पुणे(mahad madhe ghat via pune) या प्रलंबीत मार्गाला पर्यटन महामार्ग(tourism highway)  म्हणून विकसित करावे, तसेच महाड रायगड महामार्गावरील गावांना जोडणाऱ्या ॲप्रोच रोडची लांबी ५० मीटर वरुन १०० मीटर करावी, अशी विनंती खासदार छत्रपती संभाजी राजे(chatrapati sambhaji raje) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari)यांच्याकडे करावी, अशी मागणी भाजपाचे सरचिटणीस महेश शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपाचे उपतालुकाध्यक्ष चंद्रजित पालांडे, चिटणीस शैलेश बुटाला उपस्थित होते.

महाड तालुक्यासह पोलादपूर, खेड, मंडणगड, दापोलीसह कोकणाला जोडणारा सर्वात कमी लांबीचा प्रलंबित असलेला महाड- मढेघाट- वेल्हे- पाबेघाट- खानापूर मार्गे पुणे हा मार्ग स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, चवदारतळे, शिवथरघळ, किल्ले तोरणा, किल्ले राजगड, किल्ले सिंहगड, पानशेत-खडकवासला आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या पर्यटन आणि तीर्थस्थळांना जोडणारा असल्याने या मार्गाचा गडकिल्ले जोडणारा पर्यटन महामार्ग म्हणून विकास करावा अशी मागणी भाजपाचे महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी संभाजी राजे, अध्यक्ष किल्ले रायगड विकास प्राधिकरण यांच्याकडे केली आहे.तसेच ही बाब राजे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या महामार्गामुळे या भागाचा पर्यटन आणि औद्योगिक विकास होणार आहे तसेच महाड पुणे हे अंतर अवघ्या ९६ किमी. वर येणार आहे.

गडकरींचे स्वप्न असलेल्या महाड रायगड मार्गाचे रखडलेले काम जलदगतीने सुरू करुन या व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म गाव आंबडवे या महामार्गावर असणाऱ्या गावांना जोडणाऱ्या ॲप्रोचरोडची लांबी ५० मीटर ऐवजी १०० मीटर करावी, अशी मागणी देखील शिंदे यांनी निवेदनाद्वारे संभाजी राजे यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीला राजेंनी सकरात्मक उत्तर दिले असून नितीन गडकरींपर्यंत हा विषय नेणार असल्याचे आश्वासन दिले.