संकटकाळ असतानाही म्हसळयात शेतकरी राजाने उत्साहात केली भात लावणीला सुरुवात

म्हसळा : कोरोनाचा प्रादुर्भाव असो नाहीतर निसर्ग चक्रीवादळ कितीही संकट, वादळवारे आले तरी कोकणातील बळी राजा कधीही डगमगलेला किंवा शासन दरबारी रडताना दिसत नाही तर नेहमी संकटाजवळ लढत असतो. गेली चार

 म्हसळा : कोरोनाचा प्रादुर्भाव असो नाहीतर निसर्ग चक्रीवादळ कितीही संकट, वादळवारे आले तरी कोकणातील बळी राजा कधीही डगमगलेला किंवा शासन दरबारी रडताना दिसत नाही तर नेहमी संकटाजवळ लढत असतो. गेली चार महिने कोरोनाचा कार्यकाळ आणि ०३ जुनला आलेल्या चक्रीवादळाचे आस्मानी संकटात सर्वच व्यवहार कोलमडले असताना शेतकरी राजा पावसाळी शेती हंगामात कार्यमग्न झाला आहे. या वर्षी पावसाने लवकरच हजेरी लावल्याने म्हसळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्रात शेतात पेरलेले भाताचे (धान) बियाणांची उगवण चांगली झाल्याने अवघ्या २५ दिवसांत शेतकरी राजाने पाणतळ शेतात लावणीला सुरुवात केली आहे. 

मागील चार पाच महिन्यांत मुंबईकर चाकरमानी गावी येऊन राहिले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन काळात मुंबईत काम धंदे बंद असल्याने आर्थिक स्थिती कोलमडली आहे तसेच आता उद्योग धंदे कधी सुरू होतील याची शास्वती नाही, अनेकांचे रोजगार गेले आहेत. ग्रामीण भागातील काही तरुणांनी शेतीची कास धरली आहे. भाजीपाला लागवड व इतर शेतीशी निगडित व्यवसाय करण्यावर तरुणांनी भर दिला आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते त्याचबरोबर नाचणी, वरी, उडीद व शेताच्या बांधावर भाजी, इतर कडधान्य, काकडी, टरबूज फळपिकांची लागवड केलेली असते.

म्हसळा खारगावखुर्द सकलप येथील माजी सभापती महादेव पाटील व त्यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनी त्यांचे शेतात लावणीला पुरक आवण झाला असल्याने त्यांनी मोठया उत्साहात आपले शेतात भात लावणीला शुभारंभ केला आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात मुबंई व अन्य उपनगरातील मोठया संख्येने चाकरमानी गावी आले असल्याने या वर्षी त्यांचा कल शेती करण्याकडे आपोआपच वाढला असल्याने तालुक्यात या वर्षी भात, वरी, नाचणी व अन्य तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ झालेली असेल.