केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळण्यासाठी भाजपा आग्रही – देवेंद्र फडणवीस यांची कोकणवासियांना ग्वाही

अलिबाग: केंद्र सरकारकडून कोकणाला भरीव मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि कोकणवासियांना पुन्हा उभे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेहमीच सहकार्य राहील, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी

अलिबाग: केंद्र सरकारकडून कोकणाला भरीव मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि कोकणवासियांना पुन्हा उभे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेहमीच सहकार्य राहील, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज श्रीवर्धन येथे सांगितले. वादळपिडीतांना रोख रक्कम देण्यात यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी श्रीवर्धन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फडणविस विविध मुद्द्यांना हात घातला. विलंबाने होणाऱ्या पंचनाम्यांवर त्यांनी टीकेची झोड उठवली. श्रीवर्धन तालुक्यात मोठे गट नाहीत. त्यामुळे पंचनामे लवकरात लवकर झाले पाहिजेत, असे फडणवीस म्हणाले. लोकांना वादळात आश्रयस्थाने सरकारने दिली. मात्र त्यात लोकांना दाटीवाटीने कोंबण्यात आले, असे फडणवीस म्हणाले. कोकणवासियांना जाहीर केलेली मदत अगदीच तुटपुंजी आहे. त्यांना अधिक मदत कशी देता येईल, हे पाहिले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या कोकण दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही रायगड दौरा केला.  त्यांनी अलिबाग तालुक्यातील नागाव, बागमळा, चौल या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर त्यांनी निरुपणकर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचीदेखील भेट घेतली.
 
फडणवीस यांनी आज अलिबाग तालुक्यातील नागाव, बागमळा, चौल या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणीदरम्यान, फडणवीस यांनी बागायतदार शेतकऱ्यांकडून माहितीही घेतली. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन ठाकूर, जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. महेश मोहिते हे देखील उपस्थित होते.आज रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, चोल, काशिद, राजपुरी, आगरदंडा, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन आदी ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. उद्या ते
रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, अंजर्ले, पाजपांढरी आणि दापोली येथे भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील आणि स्थानिकांशी संवाद साधतील.