बाजारसमितीमध्ये देवगड हापूस अवतरला! एका पेटीची किमंत ऐकून व्हाल अवाक

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांस हा मान मिळाला आहे. हापूसची आवक झाल्यामुळे मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवगड तालुक्यातील कुणकेश्वर चांदेलवाडी येथील शेतकरी शंकर नाणेरकर यांच्या बागेतून हापूसची पहिली पेटी मुंबई बाजार समितीमध्ये पाठविण्यात आली आहे. येथील व्यापारी अविनाश पानसरे यांच्याकडे पाच डझनची एक व सव्वापाच डझनची एक अशा दोन पेट्या विक्रीसाठी आल्या आहेत. गतवर्षी कोरोनामुळे आंबा हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उलाढाल घसरली हाेती. यावर्षी चांगली उलाढाल होईल अशी सर्वाना अपेक्षा आहे.देशातील सर्वाधीक हापूसची विक्री मुंबईमध्ये होत असते. बाजार समितीमध्ये मुहूर्ताच्या आंब्याला विशेष महत्व असते. २०१८ मध्ये नोव्हेंबरमध्येच पहिली पेटी विक्रीसाठी आली होती. गतवर्षी ३० जानेवारीला देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील अरविंद वाळके यांनी हापूस विक्रीसाठी पाठविला होता. यावर्षी गतवर्षीपेक्षा लवकर पहिली पेटी दाखल झाली आहे.