corona vaccination in mumbra
प्रतिकात्मक फोटो

पनवेलमधील गावदेवी मंदिराजवळील प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. १ या ठिकाणी लसीकरणासाठी टोकन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये आणि आरोग्य अधिकारी/कर्मचाऱ्यांमध्ये वाद (dispute at panvel vaccination center)निर्माण झाला.

    पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या(panvel corporation) ३ लसीकरण केंद्रांवरच फक्त १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू आहे.लसींचा साठा मोजकाच असल्याने गर्दी टाळण्यासाठी  ज्या पात्र व्यक्ती केवळ कोविन ॲपवर नोंदणी करून त्यानुसार आपली अपॉइंटमेंट निश्चित करतील, अशा व्यक्तींनाच त्या वेळेत लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती पनवेल पालिकेने दिली आहे.

    अशातच पनवेलमधील गावदेवी मंदिराजवळील प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. १ या ठिकाणी लसीकरणासाठी टोकन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये आणि आरोग्य अधिकारी/कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. वाद वाढून नंतर हाणामारी झाल्याचेही समजते.

    लसीकरणास पात्र व्यक्तींची यादी आरोग्य विभागाने केंद्राबाहेर लावलीच नाही
    लसीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्तींची यादी लसीकरण केंद्राबाहेर लावणे आवश्यक होते; जेणेकरून लसीकरणासाठी अपॉईंटमेंट मिळालेले व्यक्ती आणि अपॉईंटमेंट न मिळालेली व्यक्ती यांना आपले नाव यादीमध्ये पाहून निश्चित करता येईल. परंतु लसीकरणास पात्र व्यक्तींची यादी आरोग्य विभागाने लसीकरण केंद्राबाहेर लावली नसल्याचा आरोप करत नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या नियोजनाविषयी संताप व्यक्त केला.

    या प्रकाराबाबत पालिकेकडे विचारणा केली असता, नागरिकांनी प्रथम आरोग्य सेतूमध्ये जाऊन किंवा कोविन या मोबाईल ॲप्लिकेशनवर रजिस्ट्रेशन करायचे. फक्त ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले म्हणजे लस मिळते असे नाही. तारखेनुसार कोटा निवडावा लागतो, जर कोटा असेल तर त्यावर क्लिक करून त्यानंतरच आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होते, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. थोडक्यात रजिस्ट्रेशननंतर कोटा असेल तरच लस मिळणार आहे.