सुधागड मधील शिळोशी गावातील ७ वर्षीय दिव्यांग चिमुकलीवर ४८ वर्षीय व्यक्तीने केला अतिप्रसंग; पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

या चिमुकलीच्या घरातील मंडळी कामासाठी बाहेर गेली होती. आणि ती आपल्या घराच्या ओट्यावर खेळत होती. हे पाहून मोहन धोंडू शिर्के (वय ४८, रा. शिळोशी) याने या मुलीला आपल्या घरात नेले व दरवाजे लावून तिला मका खाण्यास दिला.

    पाली : सुधागड तालुक्यातील शिळोशी गावात राहणाऱ्या ७ वर्षीय दिव्यांग चिमुकलीवर गावातीलच एका ४८ वर्षीय व्यक्तीने शारीरिक अत्याचार/अतिप्रसंग केला आहे. ही घटना गुरुवारी (दि.१) दुपारी ३ ते सायंकाळी ६ च्या सुमारास घडली आहे. याबाबत पाली पोलीस स्थानकात शुक्रवारी (दि.२) सायंकाळी या व्यक्तिविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या संदर्भात पाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चिमुकलीच्या घरातील मंडळी कामासाठी बाहेर गेली होती. आणि ती आपल्या घराच्या ओट्यावर खेळत होती. हे पाहून मोहन धोंडू शिर्के (वय ४८, रा. शिळोशी) याने या मुलीला आपल्या घरात नेले व दरवाजे लावून तिला मका खाण्यास दिला. त्यानंतर या मुलीचे कपडे काढून अतिप्रसंग केला.

    त्यानंतर मुलीला चहा पाजून घडलेला प्रकार कोणास सांगू नकोस अशी शपथ देऊन धमकावले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे करत आहेत.