वयोवृद्ध महिलेला तपासण्यास डॉक्टरचा नकार, दवाखानाच बंद असल्याचे पुढे केले कारण

श्रीवर्धन: श्रीवर्धन शहरातील एक वृद्ध महिला गेल्या वर्षभरापासून मेंदूच्या आजाराने अंथरुणाला खिळून आहे. या महिलेला अंथरुणावरून उठून स्वतःहून उतरता येत नाही. तसेच तिला स्वतःचे कोणतेही काम करता येत

श्रीवर्धन: श्रीवर्धन शहरातील एक वृद्ध महिला गेल्या वर्षभरापासून मेंदूच्या आजाराने अंथरुणाला खिळून आहे. या महिलेला अंथरुणावरून उठून स्वतःहून उतरता येत नाही. तसेच तिला स्वतःचे कोणतेही काम करता येत नाही. ती पूर्णपणे अंथरुणावरच असते काल रात्री या महिलेचा रक्तदाब मोठ्या प्रमाणात वाढून तापदेखील आला होता. ही महिला वयोवृद्ध आहे. या महिलेचे जावई मुजम्मिल अब्दुल सत्तार आराई यांनी श्रीवर्धन शहरातील एका डॉक्टरला घरी येऊन आपल्या सासूला तपासण्यासाठी फोन केला. मात्र या डॉक्टरने घरी येऊन तपासण्यासाठी सपशेल नकार देऊन आमचे दवाखाने आज बंद आहेत, असे सांगितले. तरी श्रीवर्धन तालुक्यातील प्रशासनाने या डॉक्टरचा शोध घ्यावा व त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मुज्जमील आराई यांनी केली आहे.