केगाव दांडा समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन

उरण:केगाव दांडा समुद्रकिनारी एक मृत डॉल्फिन मासा सापडला आहे. हा मासा कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशाच

 उरण: केगाव दांडा समुद्रकिनारी एक मृत डॉल्फिन मासा सापडला आहे. हा मासा कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशाच प्रकारे येथील किनाऱ्यावर काही वर्षांपूर्वी एक व्हेल मासा लागला होता. याची तात्काळ दखल वनखात्याने घेत या माशाचा सांगाडा संग्रहित करून ऐरोली येथील संग्राहलयात ठेवण्यात आला आहे. याचप्रमाणे या माशाचीही विल्लेवाट वनखात्याने लावावी, अशी मागणी केगाव  ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र पाटील यांनी केली आहे.