donkey at raigad

रायगडावर(Raigad) सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामासाठी दगड, विटा, वाळू किंवा अन्य आवश्यक ते सर्व अवजड साहित्य आपल्या पाठीवरून वाहून नेण्यात दीडशे गाढवांचा ताफा आघाडीवर आहे. गाढवांकडून खाली मान घालून केल्या जाणार्‍या या सेवेचे खूप वेगळेपण आहे. रायगड संवर्धनाचा एक एक चिरा त्यांच्याही कष्टातून घडत आहे. मात्र काही माथेफिरुंकडून या गाढवांना मारण्याचा प्रयत्न(donkey beaten up by mad people) केला जात आहे. त्यात काही गाढवं गंभीररित्या जखमी झाल्याचे बेलदार समाजाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.

  संजय भुवड,महाड : शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडाच्या(Raigad) उभारणीत असंख्य हातांची सेवा आहे. किंबहुना मराठी साम्राज्याच्या एकजुटीचे ते एक भक्कम प्रतीक आहे. आता तीनशे-साडेतीनशे वर्षानंतर किल्ल्याचे जतन आणि संवर्धन सुरू झाले आहे. या कामात मुक्या जनावरांचे योगदान खूप मोलाचे ठरत आहे.

  रायगडावर सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामासाठी दगड, विटा, वाळू किंवा अन्य आवश्यक ते सर्व अवजड साहित्य आपल्या पाठीवरून वाहून नेण्यात दीडशे गाढवांचा ताफा आघाडीवर आहे. गाढवांकडून खाली मान घालून केल्या जाणार्‍या या सेवेचे खूप वेगळेपण आहे. रायगड संवर्धनाचा एक एक चिरा त्यांच्याही कष्टातून घडत आहे. मात्र काही माथेफिरुंकडून या गाढवांना मारण्याचा प्रयत्न (donkey beaten up by mad man)केला जात आहे. त्यात काही गाढवं गंभीररित्या जखमी झाल्याचे बेलदार समाजाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.

  रायगड म्हणजे सह्याद्रीचा अतिशय दुर्गम भाग राजधानी साठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड निवडला. हिरोजी इंदुलकरांसारख्या कसबीने गड बांधण्यात मोठा वाटा उचलला. गड म्हणजे केवळ तटबंदी राजवाडा असे नव्हे तर नैसर्गिक जलसाठ्यांचे नियोजन केले. आजही हे जलसाठे पर्यावरणाच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय ठरले आहेत.

  याच रायगडावर छत्रपती शिवरायांची समाधीही आहे.तीन-साडेतीनशे वर्षे ऊन वारा पाऊस अंगावर झेलणाऱ्या या रायगडाची या काळात पडझड झाली.काही अवशेष मातीच्या खाली दडले गेले. मोठे दगड तटबंदीवरून खोल दरीत कोसळली. गडाच्या वेगवेगळ्या दरवाजांच्या कमानी पडल्या. गेल्या या परिस्थितीत रायगडाची संवर्धन करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नातून रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. आणि संवर्धनाच्या या कामास सुरुवात झाली.

  सर्वात कठीण काम होते ते गडावर पायथ्यापासून दगड, वाळू ,चुना किंवा अन्य अवजड साहित्य वाहून नेण्याचे. यासाठी रोपवेचा वापर जरूर करण्यात आला .पण रोपवे साठी प्रति किलो शुल्क आकारले जात होते. त्याचा खर्च मोठा होता. मात्र हा खर्च कमी करण्यासाठी व काही अवजड साहित्य वाहून नेण्यासाठी गाढवांच्या वापराचा पर्याय निघाला. पूर्वीच्या काळापासूनच गाढवांकडून ओझे वाहून नेण्याचे काम करून घेतले जाते . आत्ता चालू असलेल्या कामासाठीही गाढवांचा वापर करण्याचा निर्णय झाला व रोप वे च्या शुल्काच्या निम्म्या दरात गाढवाच्या मालकांना मोबदला दिला जाऊ लागला.

  या कामासाठी १५० गाढवांचा ताफा आहे. त्याला ठेवलेले साहित्य या गाढवाच्या पाठीवर लादले जाते व ते ओझे घेऊन गाढव गडाच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात करते. खूप कष्टाचे हे काम. पण गाढव त्याच्या ताकदीनुसार हे काम करते.एकदा त्याने पाठीवर ओझे घेतली की उतरल्यावरच ते थांबते. मध्ये वाटेत कुठेही बसत नाही. पण तरीही गाढव राबते म्हणून त्याला कितीही राबवून घ्यायचे नाही म्हणून गाढवाकडून फक्त दोन ते तीन फेऱ्यातच काम करून घेतले जाते. उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी त्याचे काम थांबवले जाते.

  गडाच्या पायथ्याला तळ आहे. आतापर्यंत झालेल्या रायगड संवर्धनाच्या कामात गाढवांनी आणि खूप मोठा वाटा उचलला आहे. मात्र काही दिवसांपासून काही माथेफिरुंकडून या गाढवांना जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे,अशी तक्रार बेलदार समाजाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली असून या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खा संभाजीराजे यांनी लक्ष घालावे.अशी मागणी केली आहे या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री जिल्हाधिकारी प्रांताधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले