dadli bridge

चक्रीवादळादरम्यान नदीपात्रातील पाण्याची पात वाढली आणि एक मगर या पिंजऱ्यात अडकली.

    महाड: दादली पुलाखाली(Dadli Bridge) कामगारांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अचानक एक मगर अडकली. सिस्केप, महाड नगरपालिका रेस्क्यु टीम आणि वनविभागाने अखेर या मगरीची सुखरूप सुटका केली.

    दादली पुलाच्या दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी स्कुबा डायव्हर्सचाही वापर करण्यात येतो. नदीपात्रात असलेल्या मगरींपासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी तेथे एक पिंजरा लावण्यात आला आहे. चक्रीवादळादरम्यान नदीपात्रातील पाण्याची पात वाढली आणि एक मगर या पिंजऱ्यात अडकली. तिला बाहेर पडता येत नव्हते. वनविभागाने सिस्केपला या मगरींच्या सुटकेसाठी पाचारण केले.

    वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे, वनरक्षक इ.डी. जाधव आणि प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिस्केपचे सोहम धारप, तुषार चव्हाण, कुणाल पवार, अक्षय भवरे, परेश खाडे, प्रणव कुलकर्णी, चिंतन वैष्णव, योगेश गुरव यांनी नगरपालिकेच्या रेस्क्यू टीमचे गणेश पाटील आणि त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने होडीने या पिंजऱ्याच्या ठिकाणी जावून पिंजरा तीन ठिकाणी मोकळा केला आणि मगरीला बाहेर जाण्यास मार्ग दिला. आज ती मगर बाहेर पडून नदी पात्रात गेली.