सुतारवाडी : जून महिन्यात पावसाने सुरुवात केल्यानंतर निसर्ग हिरवी शाल पांघरते सर्वत्र हिरवळ दिसते. सुतारवाडी पासून १५ कि.मी अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटातील सौंदर्य जुलै अखेर अधिक खुलून दिसते. ताम्हाणी घाटाच्या चारही बाजूंनी डोंगर असल्यामुळे येथील डोंगरावरून वाहणारे फेसाळ धबधबे पर्यटकांची मने जिंकून जातात.
सुतारवाडी : जून महिन्यात पावसाने सुरुवात केल्यानंतर निसर्ग हिरवी शाल पांघरते सर्वत्र हिरवळ दिसते. सुतारवाडी पासून १५ कि.मी अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटातील सौंदर्य जुलै अखेर अधिक खुलून दिसते. ताम्हाणी घाटाच्या चारही बाजूंनी डोंगर असल्यामुळे येथील डोंगरावरून वाहणारे फेसाळ धबधबे पर्यटकांची मने जिंकून जातात. रोहा ते पुणे ११० किमी अंतर आहे. कोलाड-सुतारवाडी मार्गे पुण्याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे मुंबई, ठाणे तसेच अन्य शहरातील हजारो पर्यटकांची दरवर्षी कुटुंबासह हजेरी असते. त्याचप्रमाणे पुणे-सातारा, अमरावती, कोल्हापूर त्याच प्रमाणे इतर शहरांतील कुटुंब वात्सल्य पर्यटक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विरंगुळा म्हणून आवर्जून येतात.
या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने थैमान घातल्यामुळे अनेक पर्यटन स्थळ सुनी सुनी दिसत आहेत. मे महिन्याच्या सुट्टीत या परिसरातील फार्महाऊसवर हजारो पर्यटकांची गर्दी असते. या वर्षी कोरोनामुळे पर्यटकांची पर्यटन स्थळांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे ताम्हिणी घाटातील अनेक लहान दुकानदारांची मोठी कोंडी झालेली आहे. जुलै ते सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस असतो. या पावसात ताम्हिणी घाटातील डोंगरावरून वाहणाऱ्या फेसाळ धबधब्याखाली भिजण्याची इच्छा अनेकांना होते. त्यामुळे तरुण-तरुणी या ठिकाणी भिजण्याची वरून पडणाऱ्या पाण्याखाली भिजण्याची मजा लुटत असतात.
ज्या प्रमाणे या ठिकाणी कुटुंब वात्सल्य पर्यटक येत असतात त्याचप्रमाणे धांगडधिंगा करणारे मद्यपी सुद्धा मोठ्या प्रमाणावर येत असतात. मद्य पिऊन रस्ता अडवणे, जोरात ओरडने, नाचने असे प्रकार अनेक वेळा या परिसरात घडलेले आहेत. अनेक तक्रारी केल्यानंतर या परिसरात पोलिसांची गस्त ठेवण्यात आल्यानंतर मद्यपींना थोडा आवर आला. त्यामुळे कुटुंबासह पर्यटनाची मजा लुटणाऱ्यांना हायसे वाटले आणि या परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत गेली. हिरव्यागार निसर्गात डोंगरावरून पडणाऱ्या धबधब्याच्या खाली सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना होतो. या परिसरात जेवणाची व्यवस्था असल्यामुळे निसर्गाचे फुललेले सौंदर्य पाहण्याचा मोह अनेकांना होत असतो. मात्र कोरोनामुळे यावर्षी हा परिसर सुना सुना आहे.