रायगड जिल्ह्यात ८४ नवीन कोरोना रुग्ण, ९ जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ८४ नवीन रुग्ण सापडले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ५३ पनवेल ग्रामीणमध्ये ९ , रोहा १३ ,

  पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ८४ नवीन रुग्ण सापडले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ५३  पनवेल ग्रामीणमध्ये ९ , रोहा १३ , अलिबाग ३, कर्जत २ , खालापूर २,  उरण आणि पेणमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे . रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २६०४ झाली असून जिल्ह्यात ११० जणांचा मृत्यू झाला आहे.                

रायगड जिल्ह्यात आज  कोरोनाचे ८४ नवीन रुग्ण सापडले असून ७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात ६२ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ५३ नवीन रुग्ण सापडले आहेत. आज  पनवेल महापालिका क्षेत्रात ५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे . त्यामध्ये पनवेलमधील ४ व्यक्ती आणि तळोजा पानाचंदमधील एका व्यक्तीचा समावेश आहे . पनवेल ग्रामीणमधील विचुंबे , महाड , पेण आणि खालापूर येथील एका व्यक्तीचा मृत्यू  झाला आहे. पनवेल ग्रामीण मध्ये ९ , रोहा तालुक्यातील नवीन १३ रुग्णांमध्ये धोंडखार खोपे येथील ४, पडम येथील २ आणि वरवठणे येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. अलिबागमधील तीन नवीन रुग्णांमध्ये मोठे शहापूर, अलिबाग मठआळी आणि पोयनाड बांधण येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे याशिवाय  कर्जत २ , खालापूर २,  पेण  आणि  उरणमध्ये प्रत्येकी एक  नवीन  रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात सोमवारपर्यंत ७०१४ टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी २६०४  पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच ६८ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १७३६ जणांनी मात केली असून ७५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ११० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.