विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या कार्य तत्परतेने विद्युत पुरवठा झाला सुरळीत

पनवेल :निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात आणि पनवेलमध्ये ग्रामीण तसेच शहरी भागात घरांचे कौल, पत्रे उडून फार मोठे नुकसान झाले. चक्रीवादळामुळे विद्युत पोल, झाडे पडून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या

पनवेल :निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात आणि पनवेलमध्ये ग्रामीण तसेच शहरी भागात घरांचे कौल, पत्रे उडून फार मोठे नुकसान झाले. चक्रीवादळामुळे विद्युत पोल, झाडे पडून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या वादळात पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते  प्रितम म्हात्रे यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. पनवेल शहरातील घाटे आळी, भगत आळी, यशोपुरम सोसायटी, लाईन आळी येथे विद्युत पोल पडल्यामुळे बुधवार ३ जून  पासून विद्युत पुरवठा खंडित होता. मुसळधार पावसामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काम करणे मुश्किल झाले होते. पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी एमएसईबी (महावितरण) सोबत वारंवार पाठपुरावा ठेवत युद्ध पातळीवर हे काम करून घेत विद्युत पुरवठा सुरू करून घेतला. त्यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे सातत्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्कात राहून वीज पुरवठा केव्हा सुरू होईल यासंदर्भात रहिवाशांनासुद्धा वारंवार माहिती देत राहीले. याबद्दल स्थानिक रहिवाशांनी प्रितम म्हात्रे यांचे आभार मानले आहेत.