रायगड जिल्ह्यात आजपर्यंत ११०३ रुग्णांनी केली कोरोनावर मात, आज ४६ नव्या रुग्णांची नोंद

पनवेल : रायगड जिल्ह्यात स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकार शक्तीच्या जोरावर आतापर्यंत ११०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज ४६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होऊन जिल्ह्यात आज दिवसातील

पनवेल  : रायगड जिल्ह्यात स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकार शक्तीच्या जोरावर आतापर्यंत ११०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज ४६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होऊन जिल्ह्यात आज दिवसातील कोरोनाबाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-२६, पनवेल (ग्रा)-१०, उरण-१, खालापूर-१, कर्जत-२, अलिबाग-२, महाड-४ अशा प्रकारे एकूण ४६ ने वाढ झाली आहे. आजच्या दिवसात पनवेल (मनपा)-२, महाड-१ अशा ३ व्यक्तींची मृत व्यक्ती म्हणून नोंद झालेली असली तरी पनवेल मधील २ मृत्यू हे मंगळवारी झाले आहेत . 

रायगड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-२४०, पनवेल ग्रामीण-५५, उरण-११, खालापूर-३, कर्जत-१३, पेण-१०, अलिबाग-७, माणगाव-५, तळा-४, म्हसळा-११, महाड-१५, पोलादपूर-७ अशी एकूण ३८१ झाली आहे. कोरोनाबाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-५४१, पनवेल ग्रामीण १९६, उरण-१५८, खालापूर-१०, कर्जत-१७, पेण-१३, अलिबाग-३४, मुरुड-१३, माणगाव-४६, तळा-८, रोहा-२३, सुधागड-२, श्रीवर्धन-९, म्हसळा-१८, महाड-२, पोलादपूर-१३ अशी एकूण ११०३ आहे.         

आतापर्यंत पनवेल मनपा-३६६, पनवेल ग्रामीण-९, उरण-१, खालापूर-१, कर्जत-३, अलिबाग -३, मुरुड-२, तळा-१,  श्रीवर्धन-२, म्हसळा-३, महाड-५, पोलादपूर-१ असे एकूण ६७ नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना लढाईत यशस्वी झाले नाहीत. आतापर्यंत जिल्ह्यातून ४ हजार ८८६ नागरिकांचे स्वॅब कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून  तपासणी अंती त्यापैकी ३ हजार २३३ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले  आहेत तर तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या १०२ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार ५५१ नागरिकांचे  रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.