इंदापूरात अकरा वर्षाच्या चिमुरडीची कोरोनावर मात

कोरोना मुक्त चिमुरडीसह आईचे फुलांच्या वर्षावाने स्वागत इंदापूर: लाॅकडाऊनच्या काळात मुंबईहुन मौजे शिरसोडी (ता.इंदापूर) येथे आलेल्या चार सदस्सीय कुटुंबातील अकरा वर्षाच्या चिमुरडीसह तीची आई तपासणीत

कोरोना मुक्त चिमुरडीसह आईचे फुलांच्या वर्षावाने स्वागत

इंदापूर: लाॅकडाऊनच्या काळात मुंबईहुन मौजे शिरसोडी (ता.इंदापूर) येथे आलेल्या चार सदस्सीय कुटुंबातील अकरा वर्षाच्या चिमुरडीसह तीची आई तपासणीत कोरोना पाॅझीटीव्ह आढल्याने त्यांना इंदापूर येथील कदम गुरूकुल मध्ये पुढील उपचारासाठी ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान ११ वर्षीय चिमुरडीसह तीच्या आईने कोरोनावर मात केल्याने दोघांनाही आज (शुक्रवारी) सकाळी नऊ वाजता कदम गुरूकुल येथुन डीस्चार्ज देण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी पूणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, सोनाली मेटकरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुरेखा पोळ, इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय वैद्यकीय अधिक्षक एकनाथ चंदनशिवे यांनी कदम गुरूकुल येथे उपस्थीत राहुन चिमुरडीसह तीच्या आईचे पुष्प वर्षावाने स्वागत करत शुभेच्छा दील्या.

गुरूवार (दि.१४) मे रोजी मुंबईहुन पती-पत्नी व त्यांची दोन मुले शिरसोडी (ता.इंदापूर) या त्यांच्या मुळ गावी आले होते. त्याच दिवशी त्यांना गावातील शाळेत कोरोंटाइन करण्यात आले होते. तर सायंकाळी त्यांना इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.तपासणीत सदर कुटुंबातील११ वर्षीय मुलगी व तीची ३५ वर्षीय आई हे कोरोना पाॅझीटीव्ह आढळुन आले होते. तर मुलीचे वडील व तीचा ७ वर्षीय लहाण भाऊ हे निगेटीव्ह आढळुन आल्याने या सर्वांना इंदापूर येथील कदम गुरूकुल मध्ये पुढील औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान कोरोनावर मात करून दोनही रूग्ण बरे झाल्याने त्यांना शुक्रवार दि.२९ मे रोजी सकाळी रूग्णांलयाच्या वतीने डीस्चार्ज देण्यात आला  आहे. पुढील सात दिवस त्यांना त्यांचे घरात होम कोरोंटाइन करण्यात येणार असल्याची माहीती इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.