म्हसळा तालुक्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ-शिवाजीराव पाटील गट संघटनेची स्थापना

म्हसळा - शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या म्हसळा तालुक्यात शिक्षकांच्या हक्काची प्राथमिक शिक्षक संघ संघटना म्हसळा शाखेची स्थापना करण्यात आली व नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात

 म्हसळा – शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या म्हसळा तालुक्यात शिक्षकांच्या हक्काची प्राथमिक शिक्षक संघ संघटना म्हसळा शाखेची स्थापना करण्यात आली व नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत करंजीकर व निलेश साळवी यांनी म्हसळा तालुका कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांनी म्हसळा कार्यकारिणीचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

सदर नवनिर्वाचित कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष पदावर नरेश जयवंत सावंत, सेक्रेटरी पदी अण्णासाहेब बिचुकले, कार्याध्यक्ष राजेश खटके, कोषाध्यक्ष जयसिंग शंकर बेटकर, कार्यालयीन चिटणीस इक्बाल अ.गफूर कौचाली, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद बाळकृष्ण मोरे यांची निवड करण्यात आली तसेच पुढील काही महिन्यांत कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार आहे.

ही संघटना राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर काम करीत असून शिक्षकांच्या हक्काचे विषय, विविध मागण्या, वेगवेगळ्या अडचणी, सोडविण्यासाठी झटत असते तसेच शैक्षणिक सामाजिक, कला, सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत असून भविष्यात तालुक्यात या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांना चालना देण्याचे काम करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष नरेश सावंत यांनी सांगितले.