लोकविकास सामाजिक संस्थेतर्फे साखर चौथ गणपतीची स्थापना

महाडच्या ग्राम दैवत श्री विरेश्वर महाराज मंदिरात साध्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. लोक विकास सामाजिक संस्थेचे यावर्षी गणपती उत्सावाचं हे पाचव वर्ष आहे. साखर चौथ गणपती उत्सव हा विशेषता आगरी समाजाचा उत्सव मानला जातो.

महाड : माजी आमदार तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महाड मधील लोक विकास सामाजिक संस्थेचे संस्थापक ( Lok Vikas Samajik Sanstha) अध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे साखर चौथ गणपतीची (Sakhar Chauth Ganpati ) स्थापना करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी महाडच्या ग्राम दैवत श्री विरेश्वर महाराज मंदिरात साध्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. लोक विकास सामाजिक संस्थेचे यावर्षी गणपती उत्सावाचं हे पाचव वर्ष आहे. साखर चौथ गणपती उत्सव हा विशेषता आगरी समाजाचा उत्सव मानला जातो. पेण, पनवेल, अलिबाग, उरण, कर्जत, खालापूर, खोपोली या भागांत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची प्रथा आहे.

परंतु दक्षिण रायगड मध्ये सुद्धा नोकरी व्यापार व्यवसायामुळे आगरी समाज बांधव स्थिरावला आहे. यामुळे एरवी लोक विकास सामाजिक संस्था महाडमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवणारी राजकारण विरहीत संघटना कार्यरत आहे. माणिकराव जगाताप यांनी साखर चौथ गणपती उत्सव दक्षिण रायगड मध्ये सुद्धा साजरा होवू शकतो या संकल्पनेतून पाच वर्षापूर्वी या उत्सवास सुरुवात केली. दोन दिवस सामाजिक मनोरंजन भजन किर्तन भव्य विसर्जन मिरवणूक अस या उत्सावाच स्वरूप होत.

लोकविकास सामाजिक संस्थेतर्फे माणिकराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव शशिकांत पगारे, प्रशांत म्हामुणकर, संदीप जाधव,सुदेश कळमकर, मंगेश जगताप, राजेंद्र कोरपे, जगदिश पवार, गजानन काप, संदेश गोठल, साहिल हेलेकर, जिगर बुटाला, दिपक सुतार, शांताराम सुतार, राजू भाई, महेश शेडगे, अनिल अजगरे, संजय पवार, उमेश जगताप, पूजा जगताप, शितल पाटेकर आदी विशेष मेहनत घेतली रविवारी सायंकाळी भोई घाट सावित्री नदी पात्रात साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे.

गणेश उत्सवाची परंपरा तशी शेकडो वर्षाची आहे आमच्या आगरी समाजात साखर चौथ गणपती उत्सव मोठ्या भक्तीभावांत साजरा केला जातो परंतु दक्षिण रायगड मधील महाडमध्ये कधी हा उत्सव साजरा केला जाईल वाटल नव्हत परंतु ते माणिकराव जगताप यांच्याचमुळे शक्य झालय.

- भुपेश पाटील , उरण ( महाड ) रायगड

हिन्दूंचं गणपती हे लाडक दैवत मानल जात माणिकराव जगताप यांच्या मुळे आम्हा आगरी समाज बांधवाना साखर चौथ गणपती उत्सवाचा आनंद महाड येथे मिळतो हे आमच भाग्यच मानतो.

- प्रशांत पाटील , दिवेआगर ( महाड ) रायगड