कोरोनाबाधित डॉक्टरने अनेक बाह्य रूग्ण तपासल्याने शहरात उडाली खळबळ

शिळफाटा - खोपोली शहरातील शास्त्री नगर मधील एका अत्यावश्यक सेवेसाठी नामंकित असलेल्या खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह येतोच त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी करण्यात आली.

 शिळफाटा – खोपोली शहरातील शास्त्री नगर मधील एका अत्यावश्यक सेवेसाठी नामंकित असलेल्या खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह  येतोच त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह तर चिमुकल्या मुलीचा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित डॉक्टरने रूग्णालयात शहरातील अनेक बाह्य रूग्ण तपासले असल्याची माहिती समोर येताच शहरात खळबळ उडाली असून रूग्णांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे. सदर रूग्णांची चौकशी होम क्वारंटाईन करीत असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी दिली आहे.

खासगी रूग्णालयातील डॉक्टरला दोन दिवस ताप कमी होत नसल्यामुळे त्यांनी खासगी रूग्णालयात स्वतःची स्वँब टेस्ट केली. असता रिपोर्ट पाँझिटिव्ह येताच सदर गंभीर बाब लपवून न ठेवता दि.६ जून रोजी सकाळी पालिकेच्या वैद्यकीय विभागात कळवून पुढील उपचारासाठी एमजीएम रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरच्या तीस वर्षीय पत्नी व चिमुकल्या मुलीची कोरोना चाचणी केली असता मुलगी निगेटिव्ह तर पत्नीची पाँझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असतानाच सदर डॉक्टरने बाह्य रूग्ण तपासणी केली असल्याची माहिती मिळताच शहरातील शेकडो रूग्ण तपासले असल्याची समजताच ते रूग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागाची धावपळ उडाली असून दोन दिवसात दोन कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रासह खोपोलीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

तर डॉक्टरने बाह्य रूग्ण तपासणी दरम्यान माक्स आदि उपकरणे वापरलीत अशी माहिती डॉक्टरने चौकशीमध्ये दिली असून सर्व रूग्णांची दुरध्वनीवरून माहिती होम क्वारंटाईन केली असल्याचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.