सुतारवाडी परिसरातील दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप

सुतारवाडी परिसरात सुमारे पंचवीस गणपतींचे आगमन झाले होते. सुतारवाडी प्रमाणे इतर गावातील दीड दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आला.

सुतारवाडी : सुतारवाडी परिसरातील दीड दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण पणे निरोप देण्यात आला. यावर्षी कोरोनाने सर्वत्र थैमान घातल्यामुळे सोशलडिस्टन्स ठेवूनच गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दर वर्षी वाजत गाजत गणरायाला निरोप देत होते. या वर्षी मात्र तसे न करता अत्यंत साधेपणाने गणपतीचे विसर्जन करण्यात आले. सुतारवाडी परिसरात सुमारे पंचवीस गणपतींचे आगमन झाले होते. सुतारवाडी प्रमाणे इतर गावातील दीड दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आला.