शांतता आणि सुव्यवस्था राखत आंबेत खाडीपट्टा विभागातील दीड दिवसांच्या गणरायाला निरोप

शासनाच्या कायदा व सुव्यस्था नियमांचे पालन करत गणेशभक्तांना साजरा करावा लागला. त्यामुळे सर्व गणेश भक्तांचा सूर कुठेतरी हरवून गेल्याचे दिसून येत होतं. आंबेत खाडीपट्टा विभागातील दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला.

म्हसळा : दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होत असलेला गणेशोत्सव यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे अगदी साध्या पद्धतीने साजरा होत आहे. तसेच शासनाच्या कायदा व सुव्यस्था नियमांचे पालन करत गणेशभक्तांना साजरा करावा लागला. त्यामुळे सर्व गणेश भक्तांचा सूर कुठेतरी हरवून गेल्याचे दिसून येत होतं. आंबेत खाडीपट्टा विभागातील दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला.

यावेळी अगदी मोजकेच गणेश भक्तांच्या उपस्थितीत बाप्पाचं विसर्जन करण्यात आले. यासाठी स्थानिक नागरिकांनी शासनाला सहकार्य करत आपली एक प्रकारची कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यास मदत केली, विसर्जन म्हटलं की गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, परंतु यावेळेस अगदी मोजकीच मंडळी उपस्थित राहून बाप्पाचं विसर्जन करण्यात आले. त्यामुळे पोलीस प्रशासनास देखील उत्तम सहकार्य लाभल्याने पोलीस वर्गाकडून गणेश भक्तांचे कौतुक करण्यात आले.