‘त्या’ शेतकऱ्याने दाखवून दिली कोकणातल्या शेतकऱ्याची आव्हानांना तोंड देत पुन्हा उभे राहण्याची जिद्द

पोलादपूर : रायगड जिल्ह्याच शेवटचे टोक असलेला दुर्गम डोंगराळ पोलादपूर तालुका. या तालुक्यातील सावित्री, ढवळी आणि कामथी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पोलादपूरातील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र

पोलादपूर :  रायगड जिल्ह्याच शेवटचे टोक असलेला दुर्गम डोंगराळ पोलादपूर तालुका. या तालुक्यातील सावित्री, ढवळी आणि कामथी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पोलादपूरातील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र कदमशेेठ यांनी दोन एकर मध्ये पेरूची लागवड केली आहे. यामध्ये त्यांनी जवळपास १२०० पेरूची झाडे लावली आहेत व त्यांनी उत्पादित केलेल्या एका पेरूचे वजन अर्धा ते एक किलो वजनाचे इतके आहे. मात्र मेहनत करुन उत्पादित केलेल्या पेरुला बाजारपेठ नसल्यामुळे  हा शेतकरी चिंताग्रस्त आहे. लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे घाऊक मार्केट बंद झाल्यामुळे अखेर कदम कुटुंबियांना स्थानिक बाजारपेठेतील फळविक्रेत्यांना पेरू विकावा लागत आहे त्यातच ३ जून रोजी वादळी पावसामुळे पेरू मोठ्या प्रमाणात गळून गेला आहे. मात्र तरीसुद्धा हार न मानता कदम यांनी काही प्रमाणात असलेली पेरूची फळे स्वतःच्या वाहनाने स्थानिक फळविक्रेत्यांना पोचवून विक्री करत आहेत. यासाठी त्यांना शिवम फ्रुट महाडचे मालक विनय गुप्ता, कृषी अधिकारी कैलास धुमाळ, कृषी सहाय्यक मनोज जाधव इत्यादींनी सहकार्य केले त्यामुळे कदम यांना आतापर्यंंत पेरू विकून लाखभर रुपयांचे उत्पन्न मिळाले. शेती विकू नये तर राखावी असे ते सांगत असतात. परिस्थिती कशीही आली तरी कोकणातला शेतकरी त्याला तोंड देत पुन्हा उभा राहतो. रामचंद्र कदम शेठ यांनी हेच आपल्या कृतीतून अधोरेेखित केले आहे. इतर अनेक शेतकऱ्यांसाठी ते आदर्श ठरत आहेत.