बिडखुर्दमधील उंबरवीरा ठाकुरवाडी येथे चक्रीवादळाचा फटका – ५४ घरांचे नुकसान

शिळफाटा : खालापूर तालुक्यात नुकताच झालेल्या चक्रीवादळवाऱ्यामुळे अनेक गावांना व आदिवासी वाड्यांना फटका बसला आहे . त्यापैकी बिडखुर्द ग्रामपंचायत हद्दीतील उंबरवीरा (नागनाथ) ठाकुरवाडी येथे

 शिळफाटा : खालापूर तालुक्यात नुकताच झालेल्या चक्रीवादळवाऱ्यामुळे अनेक गावांना व आदिवासी वाड्यांना फटका बसला आहे . त्यापैकी बिडखुर्द ग्रामपंचायत हद्दीतील उंबरवीरा (नागनाथ) ठाकुरवाडी येथे चक्रीवादळ वाऱ्यामुळे सुमारे ५४ घरांचे संपूर्ण नुकसान होऊन सगळ्याच्या घरांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.  या झालेल्या नुकसानीचे गांभीर्य ओळखुन बिडखुर्द ग्रामपंचायतीचे  उपसरपंच तथा  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  खालापूर युवक अध्यक्ष गौरव(कुमार) दिसले यांनी त्वरीत उंबरवीरा येथे जाऊन परीस्थितीची पाहणी करून आढावा घेतला.  तात्काळ  रायगड जिल्हाच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना व आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी संपर्क करून चक्रीवादळामुळे झालेल्या परिस्थितीची माहिती दिली . तसेच माजी आमदार सुरेश लाड ,जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुधाकर घारे ,जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील तसेच उपसभापती विश्वनाथ पाटील यांना संपर्क केला. तसेच तहसीलदार ईरेश चप्पलवार ,गटविकास अधिकारी संजय भोये यांना त्वरीत बोलावून नुकसान झालेल्या आदिवासी वाडीवर येऊन पाहणी केली करून पंचनामे करण्यात आले . त्यानंतर आदिवासी ठाकूरवाडीतील नुकसान ग्रस्त नागरिकांना शासनाची मदत लवकरात लवकर मिळून देण्याचे  अश्वासन दिले तसेच तलाठी व ग्रामसेवकांनी त्वरीत पंचनामे करून घेतले, व उपसरपंच कुमार दिसले यांनी मा.तहसीलदार ईरेश चप्पलवार यांना सदरची नुकसानीची परस्थिती निदर्शनास आणून दिली असता ५४ कुटुंबांना पुढील काही दिवस पुरेल एवढे धान्य मिळवून दिले तसेच तात्पुरती व्यवस्था म्हणून घरांच्या वर टाकण्यासाठी ताडपत्रीची व्यवस्था करून दिली.त्याचबरोबर उपसरपंच कुमार दिसले यांनी उबरवीरा येथे ५४ घरांमधील २२५ नागरिकांना स्वःखचीने जेवण बनवून त्याच्या जेवणाची व्यवस्था केली.