एस. टी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच – कामगार संघटनेच्या मागणीचे यश

सुतारवाडी : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी ने-आण करणाऱ्या तसेच जिल्ह्यांतर्गत व परराज्यातील मजुरांची वाहतूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा ५० लाखाचा विमा उतरविण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र

 सुतारवाडी : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी ने-आण करणाऱ्या तसेच जिल्ह्यांतर्गत व परराज्यातील मजुरांची वाहतूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा ५० लाखाचा विमा उतरविण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिलजी परब यांनी एसटीच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त केली. कोरोनाच्या परिस्थितीत जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ५० लाखांचा विमा उतरविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे तसेच जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, महाराष्ट्र  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब,  राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब,  राज्याचे परिवहन राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील,  तसेच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने साहेब यांच्याकडे वारंवार केली होती. व याबाबतीत पाठपुरवठा सुद्धा करण्यात आला होता.

या मागणीच्या अनुषंगाने १ जून  रोजी परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब  यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत असताना या परिस्थितीमध्ये अतिरिक्त घेऊन काम करणाऱ्या एस.टी कर्मचाऱ्यांचे परब यांनी कौतुक केले. तसेच एस.टी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमाकवच देण्यात येईल अशी घोषणा केली. एस.टी ला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी संघटनेच्या सहकार्याने ठोस पावले उचलली जातील असे सूतोवाच त्यांनी केले.  विमा उतरल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे व हा निर्णय घेतला गेल्यामुळे कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे  यांनी प्रशासनाचे आभार मानले. एसटी कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा उतरविण्याबाबत संघटनेच्या केंद्रीय नेतृत्वाने वारंवार पाठपुरावा केला होता.  संघटनेने केलेल्या एस.टी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून द्या,  या मागणीला सुद्धा परिवहन मंत्री परब  असाच सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास एस.टी कामगार संघटनेला आहे.