रायगड जिल्ह्यात आज सापडले ५७ नवीन रुग्ण

पनवेल :रायगड जिल्ह्यात आज ५७ नवीन रुग्ण सापडले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर २५ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात ३७ , पनवेल ग्रामीणमध्ये १६, उरण २ ,

पनवेल :रायगड जिल्ह्यात आज ५७  नवीन रुग्ण सापडले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर २५ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात ३७ , पनवेल ग्रामीणमध्ये १६, उरण २ , अलिबाग  आणि माणगावमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. आज पनवेल महापालिका क्षेत्रात २  आणि माणगावमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १७०९ झाली असून  जिल्ह्यात  ७४ जणांचा मृत्यू झाला आहे.  

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ५७  नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल तालुक्यात ५३  नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ३७  नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात तळोजा पानाचंद येथील एकाच कुटुंबातील दोन व्यक्ति पॉझिटिव्ह आल्या होत्या त्यापैकी एका व्यक्तीचा आणि खारघर येथील  शांतिकुंज सोसायटीतील ६ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या होत्या त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला  आहे.माणगाव तालुक्यात ही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.  पनवेल ग्रामीण मध्ये १६ , उरण २ , अलिबाग आणि माणगाव मध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात आजवर ५३२४  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १७०९  पॉझिटिव्ह आल्या आहेत १०९  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १२३८ जणांनी मात केली असून ३९७  रुग्णांवर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ७४  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.