रायगड जिल्ह्यामध्ये ५६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ५६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होऊन सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पनवेल मनपा-२२९, पनवेल ग्रामीण-६०, उरण-१०, खालापूर-३, कर्जत-७,

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ५६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होऊन सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पनवेल मनपा-२२९, पनवेल ग्रामीण-६०, उरण-१०, खालापूर-३, कर्जत-७, पेण-१०, अलिबाग-५, मुरुड-३, माणगाव-६, तळा-२, म्हसळा-११, महाड-१५, पोलादपूर-७ अशी एकूण ३६८ झाली आहे.आजच्या दिवसात एकाही व्यक्तीची मृत व्यक्ती म्हणून नोंद झालेली नाही

 आज दिवसभरातही पनवेल मनपा-५५, पनवेल ग्रामीण-२, उरण-१, कर्जत-७, अलिबाग-२, तळा-२  असे एकूण ६९ नागरीक कोरोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. आतापर्यंत पनवेल मनपा-५९६, पनवेल ग्रामीण १९८, उरण-१५९, खालापूर-१०, कर्जत-२४, पेण-१३, अलिबाग-३६, मुरुड-१३, माणगाव-४६, तळा-१०, रोहा-२३, सुधागड-२, श्रीवर्धन-९, म्हसळा-१८, महाड-२, पोलादपूर-१३ अशा  एकूण ११७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे 

     आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-४४, पनवेल (ग्रा)-७, कर्जत-१, मुरुड-३, माणगाव-१अशा प्रकारे एकूण ५६  ने वाढ झाली आहे. आजच्या दिवसात एकाही व्यक्तीची मृत व्यक्ती म्हणून नोंद झालेली नाही. आतापर्यंत पनवेल मनपा-३६, पनवेल ग्रामीण-९, उरण-१, खालापूर-१, कर्जत-३, अलिबाग-३, मुरुड-२, तळा-१,  श्रीवर्धन-२, म्हसळा-३, महाड-५, पोलादपूर-१ असे एकूण ६७ नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते कोरोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.