कोरोनामुळे रोहा एस.टी आगाराचे आर्थिक नुकसान

रोहा एस.टी आगारामध्ये एकूण ५७ एसटीच्या गाड्या उपलब्ध आहेत. त्यापैकी १३ ऑगस्टपासून रोहा-नागोठणे, कोलाड, विरजोली विभागांसाठी काही महत्त्वाच्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गणपती सणासाठी परतीच्या वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास गाड्यांची वाढ करण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे यांनी सांगितले.

सुतारवाडी – मार्च महिन्यापासून कोरोनाने सर्वत्र शिरकाव केल्यामुळे लाखोंचे उत्पन्न बरबाद झाले. अनेक हातांचे काम गेल्याने लाखो जनता हलाखीचे जीवन जगत आहे. लाल परी दिसली की अनेकांना हायसे वाटते मग ती थांब्यावर थांबो किंवा न थांबो. अशी एस.टीची गाडी तब्बल पाच महिने बंद असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक आगारांचे करोडो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रोहा आगाराचे सुद्धा ३ कोटी ३७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

रोहा एस.टी आगारामध्ये एकूण ५७ एसटीच्या गाड्या उपलब्ध आहेत. त्यापैकी १३ ऑगस्टपासून रोहा-नागोठणे, कोलाड, विरजोली विभागांसाठी काही महत्त्वाच्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गणपती सणासाठी परतीच्या वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास गाड्यांची वाढ करण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे यांनी सांगितले. आपला प्रवास सुखकर होण्यासाठी प्रवाशांनी एसटीनेच प्रवास करावा असे त्यांनी आवाहन केले आहे. सध्या खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर धावताना दिसत आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक शिवशाही बसची व्यवस्था केलेली असताना सुद्धा ५० टक्के प्रवासी खासगी वाहनातून प्रवास करणे पसंत करतात.

गणपती सण आणि दिवाळी सण या दोन सणांमध्ये तसेच मे महिन्यात खूपच प्रवासी आपल्या गावाकडे जातात. त्यातील निम्मे प्रवासी खासगी वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागतो. खासगी वाहनांपेक्षा एस.टीचा प्रवास सुखकर असतो तरीसुद्धा प्रवाशी खाजगी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसत आहेत. रोहा आगाराचे कोविड-१९ मधील तोटा असा मार्च ५७ लाख,  एप्रिल ९८ लाख, मे ६० लाख,  जून ६० लाख,  जुलै ६२ लाख असे एकूण ३ कोटी ३७ लाखांचा तोटा कोरोनामुळे रोहा आगाराला बसला आहे.