पनवेलमध्ये मास्क न लावता फिरल्यास भरावा लागेल दंड – आयुक्तांनी काढले आदेश

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात मास्क न लावणे महाग पडणार आहे. पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज पुढील आदेश होईपर्यंत महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क न लावता

 पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात मास्क न लावणे महाग पडणार आहे. पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज पुढील आदेश होईपर्यंत महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क न लावता फिरणार्‍यांना १०० रुपये दंड आणि कलम १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क लावण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये पुढील आदेश दिले आहेत. 

या आदेशातील मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

१. सर्व  व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी जसे रस्ता , रुग्णालय , कार्यालय आणि बाजारपेठ इत्यादी ठिकाणी मास्क परिधान करणे अनिर्वाय आहे.

२.कोणतीही व्यक्ति आपल्या वैयक्तिक अथवा सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना तिला  मास्क परिधान करणे अनिर्वाय आहे.

३.कोणतीही व्यक्ति वाहनामध्ये, कार्यालयात किवा कामाच्या कोणत्याही ठिकाणी काम करताना मास्क परिधान करणे अनिर्वाय आहे.

४.  कोणतीही व्यक्ति , अधिकारी बैठक , लोकांचा जमाव किवा कामाच्या ठिकाणी हजर राहताना मास्क अनिर्वाय आहे.

५. केमिस्टकडे उपलब्ध असलेले सुधारित मास्क किवा घरी बनवलेले धुता येणारे मास्क धुवून निर्जंतुकीकरण करून पुन्हा वापरता येतील असे मास्क वापरता येतील 

या सूचनांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीस भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनीय कायदेशीर कारवाईस व १०० रुपये दंडास पात्र राहतील. दंड वसूली आणि कलम १८८ नुसार कारवाईसाठी  प्रभारी पोलीस अधिकारी त्यांचे कर्मचारी किवा महापालिकेचे प्रभाग अधिकारी सक्षम असतील, असे या आदेशात म्हटले आहे