truck fire

माणगाव शहरातील(fire at mangav) दिघी पुणे महामार्गावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खंदाड आदिवासी वाडी समोरील मोकळ्या जागेत नागपूरहुन माणगावमध्ये सतरंजी चादर माल भरून आलेल्या ट्रक (truck fire) क्रमांक एम एच १२-एच डी ४४४८ ला अचानक आग लागली.

  माणगाव: माणगाव शहरातील दिघी पुणे महामार्गावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खंदाड आदिवासी वाडी समोरील मोकळ्या जागेत नागपूरहुन माणगावमध्ये सतरंजी चादर माल भरून आलेल्या ट्रक क्रमांक एम एच १२-एच डी ४४४८ ला अचानक आग लागली. या घटनेमुळे माणगावमध्ये एकच हलकल्लोळ माजला. नगर पंचायत कर्मचारी नागरिक ,प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी लाखोंच्या घरात वित्तहानी मात्र नक्की झाली आहे.गेल्या १५ दिवसांतील माणगाव शहरात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे.

  truck fire in mangav
  ही आग विझविण्यासाठी माणगाव नगर पंचायत कर्मचारी दशरथ गावडे, पोलीस स्वप्नील कदम यांनी स्वतः हजर राहून तसेच चेतक इंटरप्रायजेस,जे एम म्हात्रे इन्फ्रा, फ्री बर्ड मोरबा, माधुरी वॉटर सप्लाय माणगाव, यांनी पाणी टँकर पाठवून आग आटोक्यात आणण्याचे काम केले.

  घटनेची माहिती मिळताच माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील,माणगाव नगराध्यक्षा योगिता चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

  ही आग कशामुळे लागली हा चिंतेचा विषय आहे. मात्र घटनास्थळी ट्रक ज्या ठिकाणी जळत होता. त्यासमोरून विद्युत वितरण कंपनीच्या फोर फेज लाईनचा झुला झाला आहे. त्या लाईनला ट्रक च्या हुडकरीता बांधण्यात आलेल्या रेक्झिनचे तुकडे चिकटले आहेत. त्यामुळे ट्रक मेन लाईन ला स्पार्क होऊन उडालेल्या ठिणगीमुळे ट्रकने पेट घेतला असावा,असे ट्रक चालकाचे म्हणणे आहे.

  माणगाव ग्रामपंचायतची नगर पंचायत होऊन ५ वर्षे झाली आता निवडणूक देखील तोंडावर आहे. फायर ब्रिगेडसाठी तरतूद देखील केली गेली आहे. मंजुरी देखील मिळाली. मात्र माणगावकर फायर ब्रिगेडच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या महाड किंवा रोहा नगर परिषदेकडून बबंब मागवला जातो .मात्र तो पोहचायला १ तास लागत असल्याने कुठल्याही प्रकारची घटना घडू शकते.