रोह्यातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग, आगीत दुकान पुर्णपणे जळून खाक

रोहा शहरातील भूमिका कलेक्शनच्या कपड्याच्या दुकानाला पहाटेच्या दरम्यान भीषण आग लागली. त्यामुळे दुकान पुर्णपणे जळून खाक झालं असून सुमारे १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    रायगड : रोह्यातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पहाटेच्या दरम्यान घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, रोहा शहरातील भूमिका कलेक्शनच्या कपड्याच्या दुकानाला पहाटेच्या दरम्यान भीषण आग लागली. त्यामुळे दुकान पुर्णपणे जळून खाक झालं असून सुमारे १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    या घटनेची माहिती अग्निशमन दलाल मिळाली असता, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण करण्यात अग्निशमन दलाल यश मिळाले आहे.