कोलाड पोलीस ठाण्याच्या पाच पोलिसांची कोरोनावर मात

सुतारवाडी – कोलाड पोलीस ठाण्याच्या पाच पोलिसांची दिनांक २० जुलै रोजी तपासणी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना २१ जुलै २०२० ला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. २८ दिवस कोरोनाशी लढून त्यावर मात केली आणि पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाले. यामध्ये सहाय्यक फौजदार शरद पाटील,  पोलीस हवालदार दिलीप बेंडूगडे, पोलीस हवालदार अशोक म्हात्रे,  पोलीस हवालदार सचिन बैसाने,  तसेच समीर कोकाटे हे कोरोना वर मात करून दिनांक १७ ऑगस्ट २०२० रोजी कामावर हजर झाले. त्यांचे स्वागत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे, पो. कॉ.सौ जाधव, यांनी आदींनी औक्षण केल्यानंतर पोलिस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व योध्यानवर पुष्पवृष्टी करत गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.