पोलादपूर शहरात पुराचे पाणी शिरले दुकानदार, व्यापारी व नागरिकांचे नुकसान

गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास पोलादपूर शहरात गंगामाता हॉल, सिद्धेश्वर आळी, मच्छी मार्केट आरडीसीसी बँक , तालुका शाळा, परिसरात गुरुवार रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक सावित्री नदीच्या पात्रात पाणीपातळी वाढल्याने सुमारे पाच फुटापेक्षा जास्त पाणी भरल्यामुळे शहरातील व्यापारी दुकानदार यांचे नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने किरकोळ प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त हाती आले आहे

    पोलादपूर – पोलादपूर तालुक्यात बुधवार रोजी सकाळपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे नदी-नाल्यांना यांना पूर आला असून त्यामुळे सावित्री नदीच्या पात्रात पाणी पातळी मध्ये वाढ झाली आहे.

    यामुळे गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास पोलादपूर शहरात गंगामाता हॉल, सिद्धेश्वर आळी, मच्छी मार्केट आरडीसीसी बँक , तालुका शाळा, परिसरात गुरुवार रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक सावित्री नदीच्या पात्रात पाणीपातळी वाढल्याने सुमारे पाच फुटापेक्षा जास्त पाणी भरल्यामुळे शहरातील व्यापारी दुकानदार यांचे नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने किरकोळ प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त हाती आले आहे.