तळोजा मजकूर येथे धान्य वाटप केले म्हणून मारहाण

पनवेल : तळोजा मजकूर येथे धान्य वाटप करताना झालेल्या शाब्दिक वादातून राग धरून भाजपच्या कार्यकर्त्यांला ६ मे रोजी सायंकाळी त्याच्या घरात घुसून मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत तळोजा

 पनवेल :  तळोजा मजकूर येथे धान्य वाटप करताना झालेल्या शाब्दिक वादातून राग धरून भाजपच्या कार्यकर्त्यांला ६ मे रोजी सायंकाळी त्याच्या घरात घुसून मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल तालुक्यातील तळोजा मजकूर येथे कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजगार नाही. त्यामुळे अनेक गरीब नागरिकांची  उपासमार होत आहे. त्यामुळे अशा गरजू नागरिकांना बुधवारी भारतीय जनता पक्षातर्फे धान्य वाटप करण्यात येत आहे. स्थानिक नगरसेवकामार्फत आलेली ही मदत तळोजा मजकूर गावात वाटत असताना भाजपचे कार्यकर्ते  मुकुंद राजे यांना आपल्या भागात धान्य  वाटप करीत असल्याबद्दल  रोहित राजे आणि महेश राजे यांनी जाब विचारल्याने त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याचा राग मनात धरून  त्यांनी मुकुंद राजे यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.यामध्ये मुकुंद राजे हे जखमी झाले आहेत.  त्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात रोहित राजे आणि महेश राजे यांचे  विरुध्द तक्रार केली आहे . तक्रारदार आणि विरोधक हे नातेवाईक असून तळोजा पोलिसांनी एन.सी दाखल केली आहे.