खैराच्या अवैध साठ्यावर वन खात्याची धडक कारवाई, ३३ हजारांचा माल जप्त

तळा: लाॅकडाऊन सरु असताना त्याचा गैरफायदा घेऊन तळा तालुक्यात अवैध जंगलतोड करुन पर्यावरणाचे संतुलन बिघडवणाऱ्या लाकूड माफीयांना वन खात्याने चांगलाच दणका दिला आहे.तालुक्यातील चरई बौध्दवाडी येथे खैर या

तळा: लाॅकडाऊन सरु असताना त्याचा गैरफायदा घेऊन तळा तालुक्यात अवैध जंगलतोड करुन पर्यावरणाचे संतुलन बिघडवणाऱ्या लाकूड माफीयांना वन खात्याने चांगलाच दणका दिला आहे.तालुक्यातील चरई बौध्दवाडी येथे खैर या लाकडाची अवैध तोड करुन जंगलात माल लपवुन ठेवणाऱ्या लाकूड माफीयांना तळा वन खात्याने पकडले आहे. तसेच ३३  हजारांचा माल हस्तगत केला आहे.   

तळा वनपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार १४ एप्रिल रोजी वन खात्यास  गुप्त बातमी मिळाली. या गुप्त बातमीच्या अनुषंगाने सकाळी आठ वाजता वनरक्षक वनमजुर आणि स्टाफ यांच्या समवेत चरई येथील काही भागाची फिरती पाहणी केली असता चरई बौध्दवाडीच्या उत्तरेला मुख्य डांबरी रस्त्यापासुन शेतीकडे जाणारया कच्च्या मातीच्या मार्गावर २०० मीटरच्या अंतरावर झाडी झुडपात लपवुन ठेवलेला सोलीव खैर किटा ५.७०० घ.मी.माल सापडला. बाजारभावाप्रमाणे किमान तेत्तीस हजारांचा अनधिकृत माल सापडला. या मालाबाबत तोड करण्यासाठी अज्ञाताने कोणत्याही प्रकारची परवानगी वन खात्याकडून घेतलेली नाही. त्यामुळे हा माल जप्त करुन त्या मालावर तळा वनपाल यांचा शिक्का मारुन वाहनाच्या सहाय्याने माणगाव येथील नाणोरे डेपो येथे जमा करण्यात आला आहे.