illegal wood cutting

माझेरी भागातून बेकायदेशीररित्या तोडण्यात आलेला तोडीव लाकडांचा मोठा साठा महाड वन विभागाने जप्त(mahad forest department action on illegal wood cutting) केला. 

    महाड: महाड वन विभागाने आज मोठी कारवाई (action by mahad forest department)केली आहे. माझेरी भागातून बेकायदेशीररित्या तोडण्यात आलेला तोडीव लाकडांचा मोठा साठा महाड वन विभागाने जप्त केला.

    माझेरी गावालगत असलेल्या जंगलभागात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याची लेखी तक्रार वकील आणि शिवसेनेचे पदाधिकारी ॲड. सनी जाधव यांनी मंगळवारी महाड वन विभागाकडे केली होती. महाडचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे यांनी कालच या तक्रारीची दखल घेत, चौकशी करण्याचे आदेश दिले होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज माझेरीच्या जंगल भागात जाऊन, तोडण्यात आलेला हा सर्व साठा जप्त केला आहे.

    wood cutting truck

    जप्त करण्यात आलेल्या लाकडांची मोजदाद सुरू असून, त्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

    दरम्यान, महाड तालुक्यात अन्यत्रही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु आहे. लाकडाऊनचा फायदा घेत सुरु असलेल्या वृक्षतोडीविरोधातही कारवाई करण्याची मागणी होत आहे.