वन विभागाची कशेडी घाटात कारवाई; खवल्या मांजराची तस्करी करणारे तिघे गजाआड

कशेडी घाटातून एका रिक्षातून खवले मांजर नेण्यात येत असल्याची माहिती रोह्याचे सहाय्यक वन संरक्षक विश्वजित जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनरक्षक अजिंक्य कदम, मंगेश पव्हरे, योगेश देशमुख, वाहन चालक राजेश लोखंडे यांनी कशेडी घाटात भोगाव खुर्द गावाच्या हद्दीत तपासणी सुरु केली.

    महाड : खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक खवले मांजर आणि एक रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे. रोहा वनविभागाने ही कारवाई केली आहे.

    कशेडी घाटातून एका रिक्षातून खवले मांजर नेण्यात येत असल्याची माहिती रोह्याचे सहाय्यक वन संरक्षक विश्वजित जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनरक्षक अजिंक्य कदम, मंगेश पव्हरे, योगेश देशमुख, वाहन चालक राजेश लोखंडे यांनी कशेडी घाटात भोगाव खुर्द गावाच्या हद्दीत तपासणी सुरु केली. त्यावेळेस एम.एच.०८ एक्यू ४४४१ या क्रमांकाच्या रिक्षामध्ये हे खवले मांजर आढळून आले.

    रिक्षातील सागर श्रीकृष्ण शिर्के ( रा. चिवेली,ता. चिपळूण ), सिकंदर भाई साबळे (रा. वाघिवडे, ता.चिपळूण) या दोघांसह रिक्षा चालक मालक नरेश प्रकाश कदम (रा. कानुस्ते , ता. चिपळूण) या तिघांना वन विभागाने याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या कारवाईत महाड वनपरिक्षेत्राचे वनरक्षक शरद धायगुडे, संदिप परदेशी, रोहिदास पाटील, प्रकाश पवार, गौतम इहावळे,जंगम मेजर, मच्छिंद्र देवरे, प्रकाश जाधव, नवनाथ मेटकरी यांचेही सहकार्य लाभले. अधिक तपास सहाय्यक वनसंरक्षक रोहा हे करीत आहेत.