वाढदिवशीच काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन

काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं आज (१५ जुलै) निधन झालं आहे. अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार असणारे मधुकर ठाकूर यांनी पहाटे ५ च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. आजच म्हणजे १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो. दुर्दैवाने वाढदिवशीच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

    अलिबाग : काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं आज (१५ जुलै) निधन झालं आहे. अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार असणारे मधुकर ठाकूर यांनी पहाटे ५ च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. आजच म्हणजे १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो. दुर्दैवाने वाढदिवशीच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

    दरम्यान मधुकर ठाकूर गेल्या ३-४ वर्षांपासून आजारी होते. झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि २००४ ते २००९ या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. आज दुपारी २ वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.