रायगड जिल्ह्यात आज आढळले ४५ नवे कोरोना रुग्ण, चौघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ४५ नवीन कोरोना रुग्ण सापडले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ३० , पनवेल ग्रामीणमध्ये ४, उरण ७ , पेण

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ४५ नवीन कोरोना रुग्ण सापडले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ३० , पनवेल ग्रामीणमध्ये ४,  उरण ७ , पेण २, कर्जत आणि रोहा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आणि कर्जतमध्ये आज एका व्यक्तीचा आणि पनवेल ग्रामीणमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे . रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १६५२  झाली असून  जिल्ह्यात ७१  जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ४५  नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल तालुक्यात ३४  नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ३०  नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये ४ नवीन रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. उरण ७ , पेण २,  कर्जत आणि रोहा येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात आजपर्यंत  ५११६  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १६५२  पॉझिटिव्ह आल्या आहेत.८१  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १२१३ जणांनी मात केली असून ३६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ७१  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.