रायगडमध्ये कोरोनाचे ४५ नवे रुग्ण तर ८२ जणांची कोरोनावर मात

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ४५ नवीन रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर ८२ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ३६ , पनवेल ग्रामीणमध्ये ३ , महाड २ , कर्जत, उरण,

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ४५ नवीन रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर ८२ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ३६ , पनवेल ग्रामीणमध्ये ३ , महाड २ , कर्जत, उरण, खालापूर, अलिबाग आणि माणगावमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आज एका व्यक्तीचा  मृत्यू झाला आहे .रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची  एकूण संख्या १४५४  झाली असून  जिल्ह्यात ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.             रायगड जिल्ह्यात आज  कोरोनाचे ४५  नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल तालुक्यात ३९  नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ३६   नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेलमधील बंदर रोड वरील प्रभाकर निवास मधील ४९ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू  झाला आहे. कळंबोली १४ , नवीन पनवेल ७ ,कामोठे ६, खारघर ६ आणि पनवेलमधील ३ रुग्ण सापडले तर पनवेल ग्रामीणमध्ये  विचुंबे, वावंजे आणि शिरढोण येथे  प्रत्येकी एका रुग्ण सापडला . जिल्ह्यात महाडला २ ,अलिबाग , उरण ,खालापूर ,कर्जत  आणि माणगावमध्येही प्रत्येकी एक नवीन रुग्ण सापडला आहे

रायगड जिल्ह्यात आजपर्यंत ४६७३  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १४५४  पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच ३५  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ९५२  जणांनी मात केली असून ४३९  रुग्णांवर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ६३  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.