रायगड जिल्ह्यात आज आढळले कोरोनाचे ४३ नवीन रुग्ण, दोघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ४३ नवीन रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ४० रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात २१, पनवेल ग्रामीणमध्ये ४, अलिबाग ९, उरण ७, पेण

 पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ४३ नवीन रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ४० रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात २१, पनवेल ग्रामीणमध्ये ४, अलिबाग ९, उरण ७, पेण आणि कर्जतमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. आज पनवेल महापालिका क्षेत्रात  आणि अलिबागमध्ये  एका व्यक्तीचा  मृत्यू झाला आहे .रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १८९६  झाली असून जिल्ह्यात ८४ जणांचा मृत्यू झाला आहे.  

रायगड जिल्ह्यात आज  कोरोनाचे ४३  नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल तालुक्यात २५  नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २१ नवीन रुग्ण सापडले आहेत. कामोठे सेक्टर ३६ तिरुपति कॉम्प्लेक्समधील ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तिला पूर्वीपासून मधुमेह असल्याचा अहवाल आहे. अलिबाग तालुक्यात ९ रुग्ण सापडले असून त्यामध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे . पोयनाड येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे  पनवेल ग्रामीणमध्ये ४ , उरण ७ , पेण  आणि कर्जत १ मध्ये एक रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात आजपर्यंत ५६५४ टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १८९६  पॉझिटिव्ह आल्या आहेत. अजून ५३  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १३८५  जणांनी मात केली असून ४२७  रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात ८४  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.