पेण तालुक्यात ४ नवीन कोरोना रुग्ण

पेण : कोरोना विषाणूचा प्रसार पेण तालुक्यातही सुरू असून आज ४ नवीन रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आत्तापर्यंत पेण तालुक्यातील ५१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी २१

पेण : कोरोना विषाणूचा प्रसार पेण तालुक्यातही सुरू असून आज ४ नवीन रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आत्तापर्यंत पेण तालुक्यातील ५१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी २१ बरेही झाले आहेत. शुक्रवारी पेण शहरातील उत्कर्ष नगर परिसरातील एका ३७ वर्षाच्या पुरुषाला कोरोनाची

लागण झाली तर नागोठणे येथील रिलायन्स टाऊनशिपमधील एका ५२ वर्षाच्या तसेच एका २१ वर्षाच्या पुरुष रुग्णाला कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यातील झोतीरपाडा येथील एका ५१ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाला आहे, अशी माहिती तहसीलदार अरुण जाधव यांनी दिली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी कोरोना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.